सावंतवाडीतील उभाबाजार येथे ‘फन फेअर’सह खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन.

सावंतवाडी : सावंतवाडी शहरात प्रथमच दिपावलीनिमित्त उभाबाजार बाल गोपाल मित्र मंडळाच्या वतीने फन फेअर चे आयोजन करण्यात आले असून शुक्रवार 13 ते 15 नोव्हेंबर रोजी हा फन फेअर उभाबाजार येथे भरविण्यात आला आहे.या फन फेअर चे उद्घाटन शुक्रवार सायंकाळी होणार आहे.तर शनिवारी 14 रोजी खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.या निमित्ताने विविध खाद्य पदार्थाची मेजवाणी तसेच लहान मुलांसाठी खेळाचे स्टॉल उभारण्यात येणार असून त्याचा आनंद घेता येणार आहे.
सावंतवाडी शहरातील उभाबाजार येथे यावर्षी प्रथमच दिपावली निमित्त फन फेअर चे आयोजन करण्यात आले आहे.हा फन फेअर उभाबाजार येथील हनुमान मंदिर पासून छत्रपती शिवाजी महाराज याच्या पुतळ्या पर्यत खाद्य पदार्थाचे तसेच लहान मुलांच्या खेळाचे स्टॉल उभारण्यात येणार आहेत.तर शनिवारी सायंकाळी सात वाजता खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
तब्बल तीन दिवस हा फन फेअर चालणार असून सावंतवाडीत शहरातील नागरिकांनी या फन फेअर मधील स्टॉल चा आस्वाद घ्यावा असे आवाहन उभाबाजार बाल गोपाल मित्र मंडळ यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles