Big Breaking – मंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न. ; मध्यरात्री नेमकं काय घडलं?

छत्रपती संभाजीनगर : शिवसेना नेते आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर तीन अज्ञाताकडून हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला.मंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर बॉटल फेकून मारल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी सातारा पोलिसांकडून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. मंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर हल्ला करणाऱ्या तिघांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. मंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न समोर आल्याने खळबळ उडाली आहे. यापूर्वी सुद्धा त्यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. सातारा पोलीस ठाण्यात तिने आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

..तर सर्वसामान्यांचे काय? – संजय शिरसाट संतापले.

रात्री घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. त्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ते बेधंद अवस्थेत होते. त्यांची गाडी पडली. हे सगळं सीसीटीव्ही फुटेज माझ्याकडे आहे. ते वापस गेले, परत आले माझ्या गेट जवळ आले. माझ्या गार्डने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ते बोलले की अनेक ओएसडी माझ्या खिशात आहेत. माझं कोणी काही करू शकत नाहीत. पोलिस आणि बॉडीगार्डला ते कुठेही दात देत नव्हते. संजय शिरसाट सोडून द्या पालकमंत्री म्हणून अशा माणसाच्या घरावर हल्ला होत असेल तर सर्वसामान्यांचे काय? असा संतप्त सवाल मंत्री संजय शिरसाट यांनी विचारला.

पोलीस आयुक्तांची तक्रार करणार –

मी अनेक वेळा पोलीस कमिशनरला सांगितलं तुम्ही कुठेतरी कायदा व सुव्यवस्था पहा, या शहरात दिवसाढवळ्या ड्रग विकल्या जात, खून होतो. पोलीस कमिशनर गांभीर्याने घेत नाहीत मी निश्चित याची तक्रार मुख्यमंत्र्याकडे करेल. साधा डीसीपीसीपी, CP तर नाहीच नाही यांनी किमान येऊन व्हिजिट केली पाहिजे. मी आभार मानेल DG चं, पोलीस महासंचालकांचे रात्री बारा वाजता त्यांनी माझा फोन घेतला. त्यांनी मला सांगितलं शिरसाट साहेब काळजी करू नका मी सगळी चौकशी करतो. महाराष्ट्राचे DG फोन उचलू शकतात आमच्या CP चा फोन बंद आहे. आमचे DCP झोपलेले आहेत ACP कुठे आहेत माहित नाहीत. शहरातील पोलीस यंत्रणेवर शिरसाट यांनी असा संताप व्यक्त केला.

कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर असेल तर या शहरासाठी चांगलं नाही हे मी माझ्यावर हल्ला झाला म्हणून बोलतो अशातला भाग नाही, अनेक वेळेस मी सुद्धा पोलीस कमिशनरला आणि सर्व अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आता लोकांना काय सांगू, हल्ल्याला मी घाबरत नाही. परंतु सर्वसामान्यांचा जीव सुद्धा धोक्यात आहे हे याच्याहून दिसतं, असे ते म्हणाले.

पोलीस आयुक्तांची तक्रार करणार!

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles