✍️ शशिकांत मोरे.
धाटाव : रोह्यात एका १७ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्यावर अज्ञात दोन हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना गुरुवारी रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास रोह्यात घडली.धारदार शस्त्राने हल्ला केल्यानंतर घटनास्थळा वरून हल्लेखोर फरार झाले असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
कु.सरजील फरीद नवरंगे (रा.अष्टमी खालचा मोहल्ला ता.रोहा ) असे जखमी तरुणाचे नाव असून गुरुवारी रात्री तो अष्टमी नाक्यावर एका हातगाडीवर नाश्ता करण्यासाठी गेला असताना यावेळी दोन अनोळखी तरुण त्याच्या मागावर असल्याची बाब त्याच्या निदर्शनास आल्यानंतर तो अष्टमी येथील पेट्रोल पंपच्या दिशेने जाऊन रेल्वे स्टेशन परिसरातील दर्गा रस्त्यावर गेले असताना सदर परिसर निर्मनुष्य तसेच परिसरात अंधार असल्याचा गैरफायदा घेत अनोळखी हल्लेखोरांनी धारदार सूर्याने त्याच्या मानेवर व डोक्यावर हल्ला करून मारेकरी पसार झाले.
या हल्ल्यात अल्पवयीन विद्यार्थी गंभीर जखमी झाला.त्याला तातडीने खाजगी व नंतर रोहा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती चिंताजनक व हल्लेखोरांनी केलेला वार गंभीर असल्याने त्याना तातडीने रात्रीच अलिबाग जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या दरम्यान घटनेतील मुख्य आरोपी कोण ? व घटने मागील नक्की कारण काय ? याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी फिर्यादी तरुणाची अधिक चौकशी केली असता एक महिन्यापूर्वी आपल्याच मोहल्यातील नात्यातील तरुणाच्या भाच्याला आपण मारहाण होती.त्यावेळी मी किंवा अन्य कुणा मार्फत तुला मारहाण करणार अशी धमकी दिली होती.याच गोष्टीचा व जुन्या वादाचा मनात राग धरून मला मारहाण केल्याची माहिती फिर्यादी कु.सरजिल नवरंगे यांनी पोलिसांना दिली आहे.



