Tuesday, May 13, 2025

Buy now

spot_img

अर्चना घारे-परब यांनी घेतले कुबेर लक्ष्मीचे आशीर्वाद, व्यापारी वर्गाला दीपावलीच्या दिल्या शुभेच्छा.!

सावंतवाडी : दीपावलीच्या चौथ्या दिवशी लक्ष्मी पूजन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यानिमित्ताने शहरातील बाजारपेठ अपक्ष उमेदवार अर्चना घारे-परब यांनी व्यापारी वर्गाला दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. कुबेर लक्ष्मीचे आशीर्वाद त्यांनी घेतले. दीपावली सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी घेऊन येवो व कुबेर लक्ष्मीचा कृपाशीर्वाद सदैव राहो, अशा शुभेच्छा सौ. घारेंनी यावेळी दिल्या. बाजारपेठेतील व्यापा-यांनी आपल्या दुकान, कार्यालयात तसेच उद्योगक्षेत्रात कुबेर लक्ष्मी पूजन केले‌. यावेळी प्रसाद म्हणून बताशाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी पुंडलिक दळवी, देवेंद्र टेमकर, पुजा दळवी, देवयानी टेमकर, अॅड.सिद्धी परब, हिदायतुल्ला खान, ऋतिक परब आदी उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles