सावंतवाडी : महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी गुरुवारी प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर शहरात जोरदार प्रचाराला प्रारंभ झाला. श्री देव मुरलीधर मंदिरात श्रीफळ ठेवून न्यू सालईवाडा, शिरोडा नाका आदि परिसरात घरोघरी जाऊन प्रचार केला. माजी नगराध्यक्ष संजू परब, शिवसेना शहरप्रमुख बाबू कुडतरकर यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती.
महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर हे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी व्यक्त केला. यानंतर शहरातील घराघरात जात शिवसेना , भाजप, राष्ट्रवादी व रिपाई महायुतीचे उमेदवार मंत्री केसरकर यांना विजयी करा, असे आवाहन करण्यात आले.
यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी नगरसेवक बाबु कुडतरकर, अनारोजीन लोबो, सुरेंद्र बांदेकर, गजानन नाटेकर, अशोक पवार, प्रतिक बांदेकर, गणेश कुडव, सत्यवान बांदेकर, आगस्तिन फर्नांडिस,आशिष कदम, सुजित कोरगावकर, भारती मोरे, किर्ती बोंद्रे, किरण नाटेकर, शिल्पा सावंत आदींसह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.