कणकवली : येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयातील प्राध्यापकांनी नुकत्याच झालेल्या सेट परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. यात वाणिज्य विषयाच्या प्रा. नूतन घाडीगावकर वाणिज्य या विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत.
तसेच प्रा. साहिल माणगावकर यांनी पहिल्याच प्रयत्नात संगणक शास्त्र या विषयात पात्रता प्राप्त केली आहे.
तर इंग्रजी विषयाच्या अध्यापिका स्वीटी जाधव यांनी ‘शिक्षणशास्त्र’ या विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
सेट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व प्राध्यापकांचे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय तवटे, चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे, सचिव विजयकुमार वळंजू, सर्व विश्वस्त व सदस्य आणि प्र. प्राचार्य युवराज महालिंगे यांनी अभिनंदन केले आहे.