Monday, June 16, 2025

Buy now

spot_img

निलेश राणे हे गोरगरिब रुग्णांच्या मदतीला धावणारे मसीहा, भरघोस मतांनी निवडून आणूया.! : सलमान गांगु.

कुडाळ : कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून उमेदवार म्हणून लढणारे निलेश राणे हे गोरगरिबांचे मसीहा आहेत. आजपर्यंत त्यांच्या मदतीने मुंबईच्या पंचतारांकित खासगी हॉस्पिटलमध्ये तब्बल 1000 पेक्षा जास्त गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत पोहोचवली आहे. विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि कुडाळ, मालवण येथील अनेक गोरगरीब, गरजू तसेच आवश्यक असेल अशा रुग्णांना मोफत उपचार करून देण्यासाठी निलेश राणे यांनी सदैव मदतीचा हात पुढे केला आहे. म्हणून आता गरज आहे ती अशा संवेदनशील आणि गरिबांच्या हाकेला धावणाऱ्या व्यक्तिमत्वाला मदत करण्याची. म्हणून कुडाळ – मालवण मतदारसंघातील तमाम मतदार बांधवांना मी कळकळीची विनंती करतो की, आजपर्यंत अनेकांचे जीव वाचविणारे निलेश राणे या देवासमान कार्य करणार्‍या उमेदवारास आपण भरघोस मतांनी निवडून आणा, असे आवाहन राणे प्रतिष्ठानचे वैद्यकीय विभागाचे अध्यक्ष सलमान गांगु यांनी केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles