Wednesday, July 9, 2025

Buy now

spot_img

पर्यटन विकासाच्या वल्गना नको, कृती हवी.! : अर्चना घारे- परब.

सावंतवाडी : गेल्या दशकापासून पर्यटन हा व्यवसाय जगाच्या नकाशावर अधोरेखित झालेला व्यवसाय. जगातील अनेक छोटी मोठी राष्ट्रे ही पर्यटनाच्या माध्यमातून आर्थिक द्रुष्टीने स्वयंपूर्ण झालेली आपण पहातो. या व्यवसायामुळे परकीय चलन ही मिळते आणि मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी.

आपल्या कोकणाला निसर्गाने भरभरून दिलं. कधी कधी जे फुकट्यात मिळत त्याची किंमत आपल्याला समजत नाही. शेजारचं अगदी इवलस राज्य असलेली गोमंतकभूमी किंवा देवभूमी म्हणून पर्यटनात ज्या राज्यांचा विशेष उल्लेख केला जातो ते केरळ राज्य असेल नैसर्गिक द्रुष्टीने आपल्या परशूराम भूमी एवढी अनुकूलता नसतानाही पर्यटनात जी बाजी मारली ती कौतुकास्पद आहे.
१९९७ मध्ये म्हणजे तब्बल २७ वर्षापूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा हा भारतातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर झाला. सत्तावीस वर्षानंतरही या विषयात गांभीर्याने का काम झाले नाही?

सावंतवाडी मतदारसंघात अशी अनेक धार्मिक वा नैसर्गिक स्थळ आहेत ज्याला संस्थानकालीन इतिहास आहे. वेंगुर्ला सागरेश्वर, शिरोडा वेळागर असेल, राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पदस्पर्शाने पावन झालेली आणि मिठाच्या सत्याग्रहाची ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेली शिरोड्याची भूमी असेल. जेष्ठ साहित्यिक वि. स. खांडेकारांची भूमी, जेष्ठ व श्रेष्ठ नाटककार स्व. जयवंत दळवी यांचे आरवली गाव असेल, सावंतवाडी संस्थान, आंबोली हिल स्टेशन, दोडामार्ग तालुक्यातील मांगेली धबधबा अशी एक ना अनेक पर्यटनस्थळांचा विकास करणं सहज शक्य होतं. पण राजकीय इच्छा शक्तीचा अभाव व मतदारांना कायमस्वरूपी गृहीत धरून निवडणुकीच्या तोंडावर घोषणा करून भूमीपूजन करण्याचा नेहमीचा फंडा वापरायचा आणि एकदा निवडून आल्यावर पुन्हा ये रे माझ्या मागल्या.

शाश्वत विकासाची संकल्पना राबवताना स्थानिक लोंकाचा सहभाग आणि त्यांच्या अनुभवाचा व ज्ञानाचा उपयोग करून घ्यायचा असतो. जुन्या रूढी, परंपरा आणि आपली संस्कृती जपण्यासाठी अनुभवी व जुन्या जाणत्यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे असते. नाहीतर अनेकदा फक्त आणि फक्त क्षणिक भौतिक सुखांचा विचार करून घिसाडघाईने केलेल्या दिखाऊ विकासाचे तीन तेरा वाजतात आणि जनतेच्या पैशाना चुना लावला जातो.

सावंतवाडी शहरातील माठेवाडा येथील संस्थान कालीन आत्मेश्वर मंदिराच्या समोर असणारी शंभर टक्के नैसर्गिक स्रोत असणारी व बाराही महिने दुथडी भरून वाहणारी आणि बिसलरी पाण्यापेक्षा सुंदर आरोग्याला उपकारक असं जल देणारी तळी.. या तळीला फरशा बसवून तीचा नैसर्गिक स्ञोत बंद करून टाकला. गांधी चौकातील रंगीबेरंगी कारंजा वीस वर्षांपूर्वी जेव्हा उदघाटन झालं तेव्हा पहिले चार दिवस नागरिकांनी रंगीबेरंगी कारंजे डोळ्यात साठवून ठेवले.. तब्बल गेली वीस वर्षे तो कारंजा मृतावस्थेत आहे. ऐतिहासिक कोलगाव दरवाजा असेल, नगरपालिकेच तळ्याकाठी उभं असलेलं सुविधा केंद्र, रघुनाथ मार्केट हे शहरातील प्रकल्प बंद असून शासनाचा कोट्यवधींचा निधी पाण्यात गेला आहे.

जे विद्यमान मंत्री आणि गेली तब्बल पंधरा वर्षे आमदारकी उपभोगत आहेत ते पवार साहेबांच्या राष्ट्रवादीत आमदार असताना पवार साहेबांनी दिलेल्या निधीतून नगरपालिका संकुल, जगन्नाथराव भोसले उद्यान आणि तळ्याचे सुशोभीकरण करण्यात आले होते ज्याचा विसर हा पक्ष बदलू आमदाराना पडला.

सत्तेचे अधिकार व सत्तेचे पद असतानाही राजकीय इच्छा शक्तीचा अभाव यामुळे नैसर्गिक उपलब्धता असतानाही पर्यटनाला खऱ्या अर्थाने चालना देण्याचे प्रयत्न झाले नाहीत. त्यामुळे येणाऱ्या काळात सावंतवाडी मतदारसंघातील मायबाप मतदारानीं जर मला आशिर्वाद दिले तर निश्चितपणे तुमची ही भूमिकन्या या क्षेत्रातही दखलपात्र काम करेल.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles