Wednesday, June 18, 2025

Buy now

spot_img

लई भारी.!, सरमळे नांगरतासच्या बाल शिवभक्तांनी साकारली रायगड किल्ल्याची प्रतिकृती.

सावंतवाडी : तालुक्यातील सरमळे नांगरतास येथील बाल शिवभक्तांनी साकारलेली रायगड किल्ल्याची प्रतिकृती लक्षवेधी ठरली असून या विद्यार्थ्यानी दिवाळी सुट्टीत मातीचा आकर्षक किल्ला बनवून दिवाळीची सुट्टी खऱ्या अर्थाने सार्थकी लावली.
यावेळी या मुलांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसह मिरवणूक काढली त्यानंतर या मूर्तीचे गडावर पूजन करण्यात आले.
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे निवृत्त उपनिरीक्षक उत्तम शंकर गावडे यांच्याहस्ते या रायगड किल्ल्याच्या प्रतिकृतीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सरमळे नांगरतास शाळेच्या मुख्याध्यापिका सरस्वती गावडे, शिक्षिका सौ. दिपा गवस, अंगणवाडी सेविका गितांजली गवस, कृष्णा देसाई, वासुदेव माधव, अजयकुमार देसाई, प्राजक्ता देसाई, अक्षता देसाई आदी उपस्थित होते.
नांगरतास येथील दिव्यम देसाई, गौरेश गावडे, रिदीत गावडे, गिरीजा गावडे, स्वामिनी माधव या बाल शिवभक्तांनी हा रायगडचा किल्ला साकारला. या किल्ल्याची मूळ संकल्पना दिव्यम अजयकुमार देसाई याची तर त्यांना मूर्तिकार तथा प्रसिद्ध कलापूर्वी अजयकुमार देसाई यांचे सहकार्य लाभले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मुलांच्या या कलेचे कौतुक केले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles