सावंतवाडी : कै. पुष्पलता शिवराम भिसे (वय वर्षे 82) यांचे वृद्धपकाळाने अल्पशा आजाराने सकाळी 6.30 वाजता मंगळवारी प्राणज्योत मावळली. कै. क्रीडा तपस्वी शिवराम उर्फ शिवाजी भिसे सर सावंतवाडी कळसुलकर इंग्लिश स्कूल यांची ती पत्नी आहे. त्यांच्या निधनाने सावंतवाडी शहरांमध्ये तसेच उभा बाजारतील यांच्या सर्व नागरिकांमध्ये त्यांचे निधन झाल्यामुळे दुःख निर्माण झाले आहे. कै पुष्पलता भिसे यांच्या पश्चात त्यांची दोन मुले व एक मुलगी असून सावंतवाडी नगरपालिकेचे अधिकारी संतोष भिसे यांची ती आई आहे. त्याचप्रमाणे प्रेस फोटोग्राफर अनिल भिसे त्यांची ती आई आहे. तसेच अरुण भिसे तसेच जतिन भिसे हे कै. पुष्पलता यांचे ते पुतणे आहेत. भिसे परिवारावर कै. पुष्पलता भिसे यांच्या निधनाने शोककळा पसरली आहे. आज दुपारी 12.30 वाजता त्यांचा अंत्यविधी त्यांच्या राहत्या मुलाच्या सर्वोदय नगर सावंतवाडी इथून सावंतवाडी उपरलकर स्मशानामध्ये अंत्यविधी होणार आहे.
सहवेदना – छायाचित्रकार अनिल भिसे यांना मातृशोक, पुष्पलता भिसे यांची प्राणज्योत मालवली.
0
37



