Wednesday, May 21, 2025

Buy now

spot_img

खाकीने जपली माणूसकी! ; पीएसआय प्रमोद पाटील यांना कडक सॅल्यूट.!

रूपेश पाटील 

सावंतवाडी : अनेकदा चांगले कार्य करूनही समाजाकडून खाकी वर्दी अर्थात पोलीस बांधवांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा नकारात्मक स्वरूपाचा पहावयास मिळतो. मात्र पोलीस बांधव यांना सुद्धा हृदय असतेच. त्यांच्या ‘खाकी वर्दी’च्या आतही ‘एक दर्दी’ माणूस लपलेला असतो, हे वारंवार कर्तव्यदक्ष पोलीस प्रशासनाने दाखवलेलेच आहे. सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अशातच सावंतवाडी पोलीस ठाणे येथे कार्यरत असणारे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील यांनी खाकी वर्दीतील माणुसकीच्या दर्दी व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडवलं आहे.

सावंतवाडी तालुक्यातील सातार्डा जिल्हा परिषद शाळेत मतदान प्रक्रिया सुरू आहे. आज भर दुपारी येथे कार्यरत असणारे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील यांनी तेथे मतदानासाठी आलेल्या 78 वर्षीय वृद्ध आजींना रस्ता पार करण्यासाठी मदत केली शिवाय त्यांच्याशी आपुलकीने संवाद साधत त्यांना आपलेसे केले. वारंवार पोलीस प्रशासनाकडे बोट दाखविणाऱ्यांसाठी पीएसआय प्रमोद पाटील यांनी एक प्रकारे पोलिसातही आपल्यासारखाच दर्दी हृदयाचा माणूस असतो, हे दाखवून दिले आहे असेच म्हणावे लागेल.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles