सावंतवाडी : आजगाव मराठी शाळा माजी विद्यार्थी संघ आणि मराठी संथालय आजगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘गीता जयंती’ निमित्ताने बुधवार दि. ११/१२/२०२४ रोजी दुपारी ३:०० वाजता मराठी ग्रंथालय आजगावच्या सभागृहात वरील दोन्ही संस्थांच्या विद्यमाने आजगाव केंद्रातील मुलांसाठी ‘गीताई पठण’ स्पर्धा आयोजित केली आहे.
स्पर्धेसाठी एका गटातून एका शाळेचे ३ स्पर्थक पाठवावेत.
गट क्र.१ – इ. ३ री ते ५ वी. गीताई अध्याय १५ वा श्लोक १ ते १०
गट क्र.२ – ६ वी ते ८ वी गीताई अध्याय १२ वा श्लोक १ ते १५.
मंगळवार दि. १०/१२/२०२० रोजी संध्याकाळी ०५.०० वाजेपर्यंत स्पर्थेत सहभागी होणाऱ्या स्पर्थकांची नावे मराठी ग्रंथालय, आजगाव येथे आणून द्यावीत, असे अण्णा उर्फ रामचंद्र झांट्ये , अध्यक्ष आजगाव मराठी शाळा माजी विद्यार्थी संघ आणि मराठी ग्रंथालय आजगाव यांनी कळविले आहे.
ADVT –