चेन्नई : दाक्षिणात्य सिनेविश्वातील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेता धनुष आणि सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या यांचा अधिकृत घटस्फोट झाला आहे. 27 नोव्हेंबर 2024 रोजी चेन्नई कोर्टाने दोघांच्या घटस्फोचाला मंजुरी दिली आहे. तब्बल 18 वर्ष एकत्र संसार केल्यानंतर धनुष आणि ऐश्वर्या यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. तामिळनाडूतील कौटुंबिक न्यायालयाने बुधवारी धनुष आणि ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाला मंजुरी दिली.
चित्रपट दिग्दर्शक कस्तुरीराजा यांचा मुलगा धनुष आणि सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या यांचा विवाह 18 नोव्हेंबर 2004 रोजी दोन्ही कुटुंबांच्या आशीर्वादाने झाला. त्यांना यात्रा आणि लिंग असे दोन मुले आहेत. ऐश्वर्या – धनुष यांनी दोन वर्षांपूर्वी घटस्फोटाची घोषणा केली आहे. अखेर कोर्टाने देखील त्यांच्या घटस्फोटाला मंजुरी दिली आहे.
ADVT –