विनोद तावडे आणि अमित शाह यांच्यात मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा!

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी कोण असणार? याबाबत राजधानी दिल्लीत खलबतं सुरु आहेत. भाजपचे नेते विनोद तावडे आणि अमित शाह यांच्यात काल दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा झाली. राज्याच्या मुख्यमंत्रिपदी मराठा चेहरा नसल्यास, त्याचे काय परिणाम होतील? यावर दोघांमध्ये चर्चा झाली आहे.

महायुतीच्या नेत्यांची अमित शाहांसोबत बैठक-

महायुतीच्या नेत्यांची आज केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाह यांच्यासोबत बैठक होणार आहे. महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री असणार असल्याचं आता जवळपास निश्चित झालं आहे. अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचं नाव जाहीर होण्याची शक्यता आहे.

ADVT –

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles