Sunday, July 13, 2025

Buy now

spot_img

तथागत पतसंस्थेचा ३ डिसेंबर रोजी शुभारंभ! ; दिग्गज मान्यवरांची उपस्थिती.

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्याने स्थापन झालेल्या पहिल्या बौद्ध समाजाच्या ‘तथागत नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्ग’, कणकवली या पतपेढीचा शुभारंभ मंगळवार दिनांक ३ डिसेंबर रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत होत असून या उद्घाटन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मान्यवरांनी केले आहे.

पाच वर्षांपूर्वी जिल्ह्यातील विविध खात्यातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी,, कर्मचारी यांनी एकत्र येत जिल्ह्यात सेवाभावी सामाजिक कार्य करण्यासाठी ही सेवानिवृत्त बौद्ध अधिकारी कर्मचारी संस्था स्थापन करून याद्वारे विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प केला होता. त्याच संकल्पनेतून ही पतसंस्था उभारण्यात आली असून पतसंस्थेचे उद्घाटन मंगळवारी ३ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते व मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांच्या उपस्थितीत भगवती मंगल कार्यालय, कणकवली येथे आयोजित करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाला जिल्हा उपनिबंधक माणिक सांगळे, उपविभागीय अधिकारी (महसूल) जगदीश कातकर, कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, जिल्हा बँकेचे सीईओ प्रमोद गावडे, कणकवलीचे सहाय्यक निबंधक कृष्णकांत धुळप आदि मान्यवर उपस्थित राहणार असून मुंबई महानगरपालिकेचे सेवानिवृत्त उपमुख्य अभियंता संजय जाधव, लांजा येथील माता रमाई नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष बी. आर.कांबळे, जिल्हा बँकेचे सरव्यवस्थापक दीपक पडेलकर हे निमंत्रित मान्यवर असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे अध्यक्ष अरविंद वळंजु हे राहणार आहेत. सदर पतसंस्थेचे कार्यालय श्रीधर नाईक गॅस एजन्सी, पहिला मजला मराठा मंडळ नजीक नेहरूनगर येथे असून या मंगलमय सोहळ्यास मोठ्या संख्येने बौद्ध बांधवांनी व हितचिंतक यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन पतसंस्थेचे सचिव सुनील कदम, उपाध्यक्ष सूर्यकांत कदम व अध्यक्ष अरविंद वळंजु व मान्यवरांनी केले आहे.

ADVT –

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles