Wednesday, July 16, 2025

Buy now

spot_img

‘या’ महिलांना मिळणार नाही लाडकी बहीण योजेनचा लाभ!

मुंबई : महायुती सरकारने महिलांसाठी आणलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरलेली आहे. विधानसभा निवडणुकीआधीच माहिती सरकारने ही योजना चालू केली. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये देखील दिलेले आहे. आतापर्यंत या योजनेचे 5 हप्ते महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत. जुलै महिन्यामध्ये सरकारने या योजनेची घोषणा केली. आणि तेव्हापासूनच दर महिन्याला महिलांच्या खातात पैसे आलेले आहेत. आचारसंहिताच्या काळातच महिलांना पैसे देण्यात येत नव्हते. म्हणूनच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे महिलांना आधीच दिले होते. आता लवकरच लाडकी बहीण योजनेचा 6 वा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. डिसेंबर महिन्यात हा हप्ता येणार असल्याची माहिती हाती आलेली आहे. परंतु या योजनेअंतर्गत काही महिलांना पैसे मिळणार नाही, अशी देखील माहिती समोर येत आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीचा अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 ऑक्टोबर होती. त्यानंतर आचार संहिता लागू झाली. या काळातील ज्या महिलांनी अर्ज केलेला आहे. त्यांच्या अर्जाची छाननी पुन्हा एकदा सुरू झालेली आहे. जर त्यांच्या अर्जात काही त्रुटी आल्या तर त्यांना पुढचा हप्ता मिळणार नाही. अशी माहिती देण्यात आलेली आहे. महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीआधीच महायुती सरकार जर पुन्हा आले तर महिलांना 1500 ऐवजी 2100 देणार असल्याची माहिती दिली होती. त्यामुळे आता महिलांना नक्की कधीपासून 2100 रुपये मिळणार आहे याची माहिती समोर आलेली नाही.

कोणत्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही –

  • ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न हे 2.4 लाख हा पेक्षा जास्त आहे. त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • ज्या महिलांच्या कुटुंबातील व्यक्ती कर भरतो त्या महिलांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • ज्या महिला सरकारी विभागात काम करतात किंवा ज्यांना पेन्शन मिळते. त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • तसेच महिलांच्या कुटुंबातील सदस्य हे आमदार किंवा खासदार असतील, तरी देखील त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • ADVT- 

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles