नितीन गावडे
मुंबई : मळेवाड हेदुलवाडी येथील मुंबई येथे नोकरी व्यवसायासाठी वास्तव्यास असणाऱ्या चाकरमान्यानी 10 वर्षापूर्वी मुंबई येथे मंडळाची स्थापना केली. या मंडळाच्या 2024 ते 2019 या पाच वर्षाच्या कालावधी करिता पुन्हा एकदा नव्याने नवीन कार्यकारणी गठीत करण्यात आली या समितीच्या अध्यक्षपदी रवींद्र लक्ष्मण नाईक यांची निवड करण्यात आली असून उपाध्यक्षपदी रुपेश सुरेश नाईक तर सचिव पदी प्रणय दिगंबर राऊत यांची निवड करण्यात आली आहे.मंडळाची नवीन समिती पुढील प्रमाणे –
मंडळाची नवीन समिति अध्यक्ष रवींद्र नाईक,उपाध्यक्ष रुपेश नाईक,सचिव श्री. प्रणय राऊत,उपसचिव विजय (भाई) नाईक,खजिनदार श्री. मोहन नाईक,सदस्य म्हणून महेंद्र राऊत,समीर धारगळकर, शंकर (सूरज) राऊत,स्वप्निल नाईक,पंकज शेर्लेकर,किशोर नाईक,चिराग राऊत,प्रथमेश आपटे,दिनेश
पेडणेकर,प्रथमेश (विकी) नाईक,संदीप धारगळकर यांची निवड करण्यात आली आहे.सल्लागार म्हणून किशोर परब,प्रकाश नाईक,आनंद
नाईक,विश्वनाथ परब,शशिकांत नाईक यांची निवड करण्यात आली आहे.
नवनिर्वाचित मंडळाचे अध्यक्ष रवींद्र नाईक यांनी मंडळाचे कार्य असेच आपण पुढे नेणार असून मंडळाच्या प्रगतीचा आलेख चढता राहण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहे.तसेच मंडळाच्या माध्यमातून गावातील गरजू मुलं, गरजूंना मदत करण्यासाठी तसेच समाजोपयोगी उपक्रम राबवण्यावर आपला भर असणार आहे असे सांगितले.



