सावंतवाडी : येथील सकल मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार, कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज चॅनेलचे संपादक सीताराम गावडे यांचा वाढदिवस काल मंगळवार दिनांक १० डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज चॅनेलचे उपसंपादक प्रतिक राणे आणि रामचंद्र सावंत मित्र मंडळाच्या वतीने माऊली कर्णबधिर विद्यालय आरोस, दांडेली व दयासागर छात्रालय, विद्यार्थ्यांचे वसतीगृह रोणापाल येथे विद्यार्थ्यांना भेटवस्तू, दैनंदिन वापरातील वस्तू, मुलांकडून केक कापून व खाऊचे वाटप करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेलचे उपसंपादक प्रतिक राणे, माजी मुख्याध्यापक आबाजी सावंत – भोसले, तळकटचे माजी कोकणचे सरपंच रामचंद्र सावंत, युवा कोकणचे संपादक प्रथमेश गवस, सामाजिक कार्यकर्ते मिलिंद उर्फ धर्णे आदी उपस्थित होते.
कर्णबधिर विद्यालय आरोस, दांडेली येथील मुलांनी सीताराम गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना ग्रिटींग कार्ड देऊन शुभेच्छा दिल्या. दयासागर छात्रालय, विद्यार्थ्यांचे वसतीगृह रोणापाल यांच्याकडून देखील श्री गणेश स्तोत्र म्हणून गणरायाकडे सीताराम गावडे यांच्या दिर्घायुष्य व चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्यात आली.
ADVT-