राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती दिनी किल्ले निवतीच्या महाप्रवेशद्वाराची स्वच्छता! ; दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्या शिलेदारांचा अभिनव उपक्रम.

वेंगुर्ला : राष्ट्रमाता, राजमाता माँसाहेब जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्या वतीने वेंगुर्ले तालुक्यातील किल्ले निवतीच्या महाप्रवेशद्वाराची स्वच्छता करण्यात आली.

रविवार दिनांक १२ जानेवारी २०२५ रोजी वेंगुर्ले तालुक्यातील निवती किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या स्वच्छता मोहिमेचे आयोजन दुर्ग मावळा प्रतिष्ठान तर्फे करण्यात आलेले होते. या मोहिमेत किल्ल्यावरील प्रवेशद्वाराची स्वच्छता करण्यात आली.
या स्वच्छता मोहिमेत पंकज गावडे, योगेश येरम, रोहन राऊळ, डॉ गणेश आनंदे, प्रसाद पेंडूरकर, यतिन सावंत, उत्कर्षा वेंगुर्लेकर, वेदांत वेंगुर्लेकर, प्रिती सावंत, विराज साळगावकर, समिल नाईक, गणेश नाईक ईत्यादी सदस्यांनी सहभाग घेतला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles