सावंतवाडी : ‘कोकण लाईव्ह ब्रेकींग न्यूज चॅनेल’च्या वतीने घेण्यात आलेल्या गणपती बाप्पा सजावट व किल्ले स्पर्धा तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींचा पुरस्कार वितरण सोहळा आज संध्याकाळी ठीक चार वाजता काझी शहा बुध्दीन हाॅल सावंतवाडी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे,तरी कोकण लाईव्ह ब्रेकींग न्यूज चॅनेल च्या सर्व हितचिंतकांनी, पुरस्कार प्राप्त मान्यवरांनी व स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांनी याची नोंद घ्यावी व वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन कोकण लाईव्ह ब्रेकींग न्यूज चॅनेल च्या वतीने करण्यात आले आहे.
आज संध्याकाळी ठीक चार वाजता काझी शहा बुध्दीन हाॅल सावंतवाडी एस टी स्टॅण्ड समोर हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, युवराज लखम राजे भोसले, युवराणी श्रध्दाराजे भोसले, प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसिलदार श्रीधर पाटील, मुख्याधिकारी सागर साळुंखे, माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी पंचायत समिती सदस्य भाजपा नेते संदिप गावडे,माजी पंचायत समिती सदस्य राघोजी सावंत,भाजपा सरचिटणीस महेश सारंग, उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाला कोकण लाईव्ह ब्रेकींग न्यूज चॅनेल वर प्रेम करणाऱ्या सर्व शुभचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.