सतीश पाटणकर यांच्या २ पुस्तकांचे प्रकाशन पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते आज होणार.! ; ज्येष्ठ हास्य कवी अशोक नायगावकर, संगीतकार कौशल इनामदार, प्रा.अशोक बागवे, वात्रटीकाकार रामदास फुटाणे, कवी इंद्रजित घुले यांची ‘हास्य मैफिल रंगणार! ; सावंतवाडीच्या माजी नगराध्यक्षांचा होणार सन्मान, अनेक दिग्गज मान्यवरांची उपस्थिती लाभणार.

सावंतवाडी :  सिंधुदुर्गचे सुपुत्र, स्तंभलेखक आणि मुख्यमंत्र्याचे माजी माहिती अधिकारी सतीश पाटणकर यांच्या जाऊ तिथे खाऊ (खाद्यपर्यटन) आणि कोकण आयकॉन ( कोकणातील नर रत्नांची माहिती) या दोन पुस्तकांचे प्रकाशन महाराष्ट्राचे बंदरे आणि मत्स्यव्यवसाय खात्याचे मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या शुभहस्ते होणार आहे. हा कार्यक्रम सावंतवाडी नगरपालिका, सिंधुदुर्ग पर्यटन व्यावसायिक महासंघ, सावंतवाडी पत्रकार संघ, कोकण मराठी साहित्य परिषद, सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लब, राणी पार्वतीदेवी हायस्कुल माजी विद्यार्थी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आज रविवार दि. दि. 26 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी पाच वाजता बॅ. नाथ पै नाट्यगृह, सावंतवाडी आयोजित आहे

या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ हास्य कवी अशोक नायगावकर उपस्थित राहणार आहेत. मराठी गौरव गीताचे ज्येष्ठ संगीतकार कौशल इनामदार, ज्येष्ठ कवी प्रा. अशोक बागवे, ज्येष्ठ वात्रटीकाकार रामदास फुटाणे, कवी इंद्रजित घुले, माजी शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर, युवराज लखमराजे भोसले,, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, सावंतवाडी नगरपालिकेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे, महाराष्ट्र साहित्य संस्कृती अनुदान मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. प्रदीप ढवळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित केलेल्या या कार्यक्रमास सावंतवाडी शहरासाठी योगदान दिलेले माजी नगराध्यक्ष अॅड. दिलीप नार्वेकर, पल्लवी केसरकर, श्वेता शिरोडकर अनारोजीन लोबो, बबन साळगावकर, आणि सच्चिदानंद परब उपस्थित राहणार आहेत.

यावेळी कवी अशोक नायगावकर, कवी प्रा. अशोक बागवे, ज्येष्ठ वात्रटीकाकार रामदास फुटाणे यांची ‘अशोकांच्या नानाची (फुटाणे) टांग’ हा धमाल काव्य साहित्यिक संवाद मैफल रंगणार आहे. यात रसिकांनी सहभागी व्हावे,असे आवाहन आयोजकांतर्फेक रण्यात आले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles