सावंतवाडी : युवा सामाजिक कार्यकर्ते सागर गावडे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत कोकण लाईव्ह ब्रेकींग न्यूज चॅनेलने त्यांचा सत्कार केला. माजी शिक्षणमंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत हा सन्मान करण्यात आला. यावेळी माजी मंत्री, आम. दीपक केसरकर, युवराज लखमराजे भोंसले, युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत- भोसले, माजी नगराध्यक्ष संजू परब, ज्येष्ठ संपादक गजानन नाईक, युवा नेते संदीप गावडे, युवा नेते दिनेश गावडे, ज्येष्ठ संपादक सीताराम गावडे आदी उपस्थित होते.