Tuesday, May 13, 2025

Buy now

spot_img

लोकनेते स्व. भाईसाहेब सावंत यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त अर्धाकृती पुतळा अनावरण व स्मरणिका प्रकाशन सोहळा ४ फेब्रुवारी रोजी.; दिग्गज मान्यवरांची असणार उपस्थिती.

सावंतवाडी : शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी व नाम. भाईसाहेब सावंत प्रतिष्ठान सावंतवाडी आयोजित लोकनेते नामदार स्व. भालचंद्र अनंत तथा भाईसाहेब सावंत यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त अर्धाकृती पुतळा अनावरण व स्मरणिका प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ४ फेब्रुवारीला सावंतवाडी येथे हा सोहळा संपन्न होणार असून दिग्गज मान्यवर या निमित्ताने उपस्थित राहणार आहेत अशी माहिती नाम. भाईसाहेब सावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष विकास सावंत यांनी दिली. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

लोकनेते नामदार स्व. भाईसाहेब सावंत यांच्या १०१ व्या जयंती निमित्त अर्धाकृती पुतळा अनावरण करण्यात येणार आहे‌. माजगाव येथे ‘प्रेरणा’ सभास्थळी स.९.३० ला पुतळा अनावरण व आदरांजली वाहिली जाणार आहे. तदनंतर १०.३० वा. राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या सभागृहात स्मरणिका प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे. स्मरणिका प्रकाशनातून येणाऱ्या निधीतून गोरगरीब मुलांना कायमस्वरूपी मतद व्हावी यासाठी या निधीचा विनियोग केला जाणार आहे अशी माहिती श्री.सावंत यांनी दिली. यासह तत्कालीन रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य केंद्र, सहकारी, शैक्षणिक संस्था या त्यांनी सुरू केल्या असून ती खरी स्मारक आमच्यासाठी आहेत असं त्यांनी सांगितलं.
यावेळी ना. भाईसाहेब सावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष
विकास सावंत, शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, खजिनदार सी.‌एल.नाईक, प्रा.बाळासाहेब नंदीहळ्ळी, मनोहर वेंगुर्लेकर आदी उपस्थित होते.

या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप असणार असून माजी मुख्यमंत्री खास. नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, उद्योगमंत्री उदय सामंत, माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, माजी मंत्री दीपक केसरकर, माजी पालकमंत्री रविंद्र चव्हाण, सावंतवाडी संस्थानचे राजेसाहेब खेमसावंत भोसले, आम. निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे अशी माहिती श्री. सावंत यांनी दिली. तसेच आमदार शेखर निकम, माजी खासदार विनायक राऊत, रायगड जिल्हा बँक अध्यक्ष जयंत पाटील, माजी खासदार हुसेन दलवाई, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली, माजी आमदार परशुराम उपरकर, माजी आमदार अजित गोगटे, माजी आमदार बाळाराम पाटील, रत्नागिरी जिल्हा बँक अध्यक्ष तानाजी चोरगे, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, माजी अध्यक्ष सतिश सावंत, अरूण दुधवडकर, कॉग्रेसचे अजिंक्य देसाई आदींची उपस्थिती राहणार आहे. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष विकास सावंत, शि.प्र.मंडळाचे सचिव व्ही. बी.नाईक, आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अध्यक्ष अँड. दिलीप नार्वेकर, अमोल सावंत, डॉ. दिनेश नागवेकर आदींनी केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles