सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता मोहीम!

सावंतवाडी : येथील सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये सिस्टर स्टाफ व कर्मचाऱ्यांकडून हॉस्पिटल परिसराची स्वच्छता करण्यात आली. शासन निर्णयाप्रमाणे हा उपक्रम दर सोमवारी नऊ ते दहा या कालावधीमध्ये राबविण्यात येणार आहे, असे हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ. धीरज चौगुले यांनी सांगितले. या उपक्रमात हॉस्पिटलमधील सर्व विभागातील कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. सदर स्वच्छता अभियानाचा हा दुसरा सोमवार आहे यापुढेही दर सोमवारी हॉस्पिटल परिसरात अशाच प्रकारे स्वच्छता मोहीम हाती घेतली जाणार आहे असेही डॉ. चौगुले म्हणाले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles