कुडाळ येथील कातकरी महिलांसोबत अनोखा ‘हळदी कुंकू’ समारंभ.! ; निमित्त आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षा मानसी परब यांच्या वाढदिवसाचं.

कुडाळ : आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन, सिंधुदुर्गच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ. मानसी परब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत कुडाळ येथील कातकरी समाजातील महीलांसोबत अनोख्या पद्धतीने हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला.

कुडाळ येथील अतिशय भयावह अशा वास्तव्यास असलेल्या कातकरी समाज बांधवांच्या वेदना कमी करून त्यांना किमान एका दिवसासाठी तरी चेहऱ्यावर हास्य आणावे व त्यांच्या मनात आपलेही या जगात कोणीतरी आहे अशी भावना रुजवावी, या प्रांजळ उद्देशाने आपल्या वाढदिवसानिमित्त ‘हळदी कुंकू समारंभ’ आयोजित करून आपल्या मानवाला मानव मानून माणुसकीचा केंद्रबिंदू मानत आपला वाढदिवस कातकरी भगिनींच्या सानिध्यात राहून त्यांना हळदी-कुंकू समारंभ आयोजित करून आपला वाढदिवस अतिशय आगळे वेगळ्या पद्धतीने साजरा करत समाज मनामध्ये एक वेगळी छाप सोडली आहे.
खरंतर हा केवळ वाढदिवस किंवा हळदी कुंकू समारंभ नव्हता तर होता एक माणुसकीचा आणि माणसात राहून माणसाला माणसासारखे वागवण्याचा प्रयत्न.! यानिमित्ताने मानसी परब यांनी आपल्या वागण्यातून एक आदर्श तर निर्माण केलाच शिवाय अलीकडच्या काळात छोट्याशा सुखाने अतिशय गगनविहार करणाऱ्या व्यक्तींसाठी आदर्श असा संस्कार आणि संदेश बहाल केला आहे, असे वाटते.
यावेळी संस्थेचे जिल्हाध्यक्ष मिलिंद धुरी, उपाध्यक्ष आनंद कांडरकर, जिल्हा महिला आघाडी प्रमुख सौ. मानसी परब, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख प्रा. रुपेश पाटील, कुडाळ तालुकाध्यक्ष आर. के. सावंत, सावंतवाडी तालुकाध्यक्ष संदीप सुकी, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष अॅड. राजेंद्र खानोलकर, कुडाळ महिला तालुकाध्यक्ष सौ. दीक्षा सावंत, सदस्य साबाजी परब, सदस्य सौ. सायली रेगे, सदस्य गौतम जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles