आपचा नाही भाजपचा ‘आपला’ मुख्यमंत्री? ; सत्ता स्थापनेसाठी ‘AAP-Congress’ ची होणार आघाडी?

नवी दिल्ली : देशाच्या राजधानीत भाजपाचे कमळ फुलत असल्याचे सुरुवातीच्या कलामध्ये समोर येत आहे. येणारे कौल हे आपसाठी धक्कादायक आहेत. भाजपाचा दिल्लीतील सत्ता स्थापनेचा वनवास संपण्याची चिन्हं दिसत आहेत. दिल्लीत आपचा नाही तर भाजपाचा आपला मुख्यमंत्री येण्याची शक्यता आहे. सुरुवातीचे कल भाजपाच्या बाजूने आहेत. आता काँग्रेस, आप चूक सुधारतील का?

कलांनी AAP ची उडवली झोप –

दिल्ली विधानसभेतील 70 पैकी 70 जागांचे कल समोर आले आहे. पोस्टल मतमोजणीत आणि आता ईव्हीएममधील मतमोजणीचा कल सुद्धा भाजपाच्या बाजूने दिसत आहे. दिल्लीकरांनी आपला तिसऱ्यांदा संधी देण्यास नकार दिल्याचे दिसून येते. अर्थात आप अजूनही मैदानात आहे. तरीही भाजपाने मारलेली मुसंडी, ही सत्तेचा वनवास संपणारी दिसत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles