‘SPK’ कनिष्ठ महाविद्यालयाची खेळाडू सायली सावंत राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत अव्वल! ; राणीसाहेब शुभदादेवी भोंसले यांच्याकडून शाबासकी, राष्ट्रीय स्पर्धेसाठी दिल्या शुभेच्छा!

सावंतवाडी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे विद्यमाने आयोजित राज्यस्तर शालेय पॉवर लिफ्टिंग क्रीडा स्पर्धेत श्री पंचम खेमराज कनिष्ठ महाविद्यालय सावंतवाडी येथील इयत्ता अकरावी विज्ञान शाखेची खेळाडू कुमारी सायली सखाराम सावंत हिने 52 किलो वजनी गटामध्ये राज्यस्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.


तिच्या या उत्तुंग यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन श्रीमंत ह.हा. सौ. शुभदादेवी खेमसावंत भोंसले राणीसाहेब यांनी अभिनंदन केले. व पुढील राष्ट्रीय दिल्या स्पर्धेसाठी व वाटचालीस शुभेच्छा दिल्या.  याप्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य श्री जयप्रकाश सावंत, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. एम. ए. ठाकूर, कनिष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक प्रा. व्ही. पी. राठोड, क्रीडा विभागाचे शिक्षक प्रा. आर. एम. सावंत, प्रा. के. पी. लोबो, प्रा. पूनम नाईक, प्रा. अमोल कांबळे, प्रा. माधव भिसे, तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे इतर  शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.

ADVT –

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles