Sunday, July 13, 2025

Buy now

spot_img

सिंधुदुर्गात घाडीगांवकर समाज भवन कार्यारंभ लवकरच करू.! : घनश्याम गांवकर. ; घाडीगांवकर समाज संस्थेचा शतक महोत्सव कार्यक्रम संपन्न.

मुंबई : ज्या संख्येने घाडीगांवकर समाज संस्थेच्या शतक महोत्सवी कार्यक्रमात एकवटला आहे. तसाच घाडीगांवकर समाज भवन उभारणी कार्यासाठी एकरुप होऊन एकवटल्यास सिंधुदुर्गात घाडीगांवकर समाज भवन कार्यारंभ लवकरच करता येईल. सिंधुदुर्गात घाडीगांवकर समाज भवनांचा संकल्प सन १९९० ला त्यावेळच्या समाज बांधवांनी केला. त्यामुळे आपण हा संकल्प येत्या पाच वर्षात आपल्या सर्वाच्या साथीने पूर्ण करु, असे प्रतिपादन क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज (मुंबई) या संस्थेचे अध्यक्ष घनश्याम गांवकर यांनी केले.

मुंबईत यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात झालेल्या क्षत्रिय घाडीगांवकर सेवा समाज संस्थेच्या शतक महोत्सवी वर्ष सांगता सोहळ्यात घनश्याम गांवकर बोलत होते. यावेळी अशोक हांडे, संस्थेचे मध्यवर्ती कार्यकारणी सदस्य तथा पत्रकार विजय गांवकर, डोंबिवली विभागांचे अध्यक्ष आर के घाडीगांवकर, भाजपा मुंबई उपाध्यक्ष राजेश हाटले, शिवसेना उबाठाच्या उपनेत्या संजना घाडी, घाडीगांवकर सहकारी पतपेढीचे अध्यक्ष रघुवीर वायंगणकर, मुंबईचे माजी नगरसेवक संजय घाडी, मध्यवर्ती कार्यकारिणीचे उपाध्यक्ष लक्ष्मण घाडीगांवकर, सरचिटणिस गजानन घाडीगांवकर, खजिनदार सुहास गांवकर, रश्मी घाडीगांवकर, अभिजीत घाडी, संस्थेच्या मध्यवर्ती व विभागीय पदाधिकाऱ्यांसह कार्यकारीणीचे सर्व सदस्य व मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विजय गांवकर यांनी क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज संस्थेचे कणकवली तालुक्यातील वागदे येथे बहुउपयोगी घाडीगांवकर समाज भवन नियोजित आहे. या समाज भवन उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात निधी लागणार असुन त्यासाठी घाडीगांवकर समाजातील घटकांनी जास्तीत जास्त आर्थिक हातभार लावावा असे आवाहन केले. आर के घाडीगांवकर यांनी, आम्ही सर्व विभाग आपापल्या विभागांतील समाजबांधवापर्यंत पोहचुन समाज भवन निधी संकलन करून देण्याची ग्वाही दिली. यावेळी राजेश हाटले, संजना घाडी, रघुवीर वायंगणकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
सन १९२५ साली स्थापन झालेल्या क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज संस्थेचे संस्थापक स्व. शंकरराव सोनु घाडीगांवकर यांच्या मानपत्राचे प्रतिकांत्मक अनावरण अशोक हांडे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी घनश्याम गांवकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नियोजित घाडीगांवकर समाज भवनांचे विस्तृत सादरीकरण करून संस्था स्थापनेपासुन योगदान दिलेल्या कार्यकारी मंडळातील अध्यक्ष व सरचिटणिसांना मानपत्र देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान केला जाणार असल्याचे सांगितले. यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अशोक हांडे निर्मित मराठी बाणा या कार्यक्रमालाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी घाडीगांवकर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार विजय गांवकर यांनी तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अभिजीत घाडी यांनी केले.

ADVT –

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles