सावंतवाडी : शहरातील मोती तलावात सोमवारी उडी घेतलेल्या तरुणाचा मृतदेह अखेर आज पाण्यावर आला. पोलिसांनी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने सदर मृतदेह तलावातून बाहेर काढला. मृतदेहाची ओळख पटली असून राकेश सूर्यकांत नियोगी (वय ४२, राहणार वैश्यवाडा, सावंतवाडी) असे त्याचे नाव आहे. घटनास्थळी दाखल झालेल्या मयताच्या नातेवाईकांनी याबाबतची खात्री केली. सदर माहिती पोलीस हवालदार मनोज राऊत यांनी दिली आहे.



