तळवडे येथील कारखान्यावर वन विभागाची कारवाई अन्यायकारक !, नारायण जाधव आंदोलन छेडणार. ; तक्रारीनुसार कारवाई केली.! : वनपरिक्षेत्र अधिकारी सुहास पाटील.

सावंतवाडी : तालुक्यातील तळवडे येथील रत्नदुर्ग कात उत्पादक संघ अध्यक्ष नारायण उर्फ बाळा जाधव
यांच्या कारखान्यावर शुक्रवारी दुपारी अचानक वन विभागाच्या वतीने धाड टाकण्यात आली. यावेळी तेथे उपस्थित असलेले वनपरिक्षेत्र अधिकारी सावंतवाडी सुहास पाटील यांनी त्यांना प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार योग्य ती पाहणी केली. दरम्यान पाहणीकरता वेळी त्यांनी नमुनेसाठी तेथे उत्पादन केले जाणाऱ्या विविध बाबींचे संकलन करून नमुने देखील तपासणीसाठी घेतले.


दरम्यान वनपरिक्षेत्र अधिकारी सुहास पाटील यांच्याद्वारा केलेली कारवाई ही पूर्णतः अन्यायग्रस्त असून या चुकीच्या पद्धतीने केलेल्या कारवाईबाबत कोणतेही प्रशासकीय आदेश नसताना ही कारवाई केली आहे. त्यामुळे पुढील काळात एक मे रोजी सावंतवाडी येथील वन विभागाच्या कार्यालयासमोर आपण आपल्या सहकाऱ्यांना घेऊन आंदोलन छेडण्याचा इशारा नारायण उर्फ बाळा जाधव यांनी दिला.

दरम्यान सदर केलेली कार्यवाही कोणत्याही पूर्व नोटीस शिवाय केली असल्याचा दावाही श्री. जाधव यांनी यावेळी केला. यावेळी त्यांच्यासोबत व्येत्ये येथील जितेंद्र गावकर हे त्यांच्याच संघटनेत कार्य करणारे व्यावसायिक उपस्थित होते.

यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी सुहास पाटील म्हणाले, आमच्याकडे तक्रार दाखल असल्यामुळे आम्हाला या कारखान्याची तपासणी करणे अनिवार्य होते. त्यामुळे येथील उत्पादित केल्या जाणाऱ्या विविध गोष्टी संकलित केल्या असून पुढील काळात याची सखोल चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई होणार आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles