सावंतवाडी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात बी. टी. राठोड यांचा शिक्षक प्रतिकृतीमध्ये तृतीय क्रमांक!

सावंतवाडी : जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, पंचायत समिती सावंतवाडी आयोजित संस्कार नॅशनल स्कूल निरवडे येथे संपन्न झालेल्या ५३ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात श्री शिवछत्रपती माध्यमिक विद्यालय असनिये प्रशालेचे ज्येष्ठ  विज्ञान शिक्षक बी. टी. राठोड यांचा शिक्षक प्रतिकृतीमध्ये सावंतवाडी तालुक्यातुन तृतीय क्रमांक आला आहे.

या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रशालेतुन विद्यार्थी प्रतिकृतीमध्ये इयत्ता १०वीचा विद्यार्थी कु. गोविंद सावंत याने ‘ नैसर्गिक जलव्यवस्थापन ‘ या विषयावर तर शिक्षक प्रतिकृती मध्ये श्री. राठोड सर यांनी ‘मनोरंजनातुन विज्ञान या विषयावर प्रतिकृती (माॅडेल) निर्मिती केली.

धी.बांदा नवभारत शिक्षण मंडळ मुंबईच्या अध्यक्षा श्रीम. कल्पनाताई तोरसकर, कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद तोरसकर, सचिव संतोष सावंत, कोषाध्यक्ष वैभव नाईक, समन्वय समिती सचिव सौ.रश्मी तोरसकर, प्राचार्य तथा समन्वय समिती सहसचिव नंदकुमार नाईक, प्रशालेचे मुख्याध्यापक एम.डी. सावंत तसेच सर्व संस्था प्रतिनिधी,शालेय समिती सदस्य, पालक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी श्री.राठोड यांचे अभिनंदन केले .

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles