सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संमेलनामध्ये विविध क्षेत्रांत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या मान्यवरांचा होणार सत्कार!

सावंतवाडी : महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या अनुदानातून श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी या संस्थेने आयोजित केलेल्या पहिल्या सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संमेलनामध्ये जिल्ह्यातील विविध क्षेत्रांत महत्त्वपूर्ण योगदान देणा-या ज्येष्ठ व युवा मान्यवरांना त्यांच्या कार्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सन्मानित करण्यात येणार आहे. रविवार, दि. 28 डिसेंबर रोजी येथील राणी पार्वती देवी हायस्कूलच्या कविवर्य केशवसुत साहित्य नगरीत साज-या होणा-या उद्घाटन कार्यक्रमात या मान्यवरांना शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, पुस्तक व रोख रक्कम एक हजार रुपये देऊन गौरविण्यात येईल.
विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी सन्मानित करण्यात येणा-या ज्येष्ठ मान्यवरांमध्ये विठ्ठल गावकर, ओटवणे (दशावतार लोककला), ना. शि. परब, वेंगुर्ले (साहित्य), आबा रणसिंग, कुडाळ (चित्रकथी), गणपत परब, सावंतवाडी (मौखिक गीते), डाॅ अशोक सुर्वे, सावंतवाडी (वैद्यक क्षेत्र), संजीवनी दत्तात्रय देसाई, कुडाळ (पत्रकारिता), प्रभाकर भागवत, सावंतवाडी (वाड्मयीन कार्यकर्ता), विजयालक्ष्मी हनुमंत भोसले, बांदिवडे-मालवण (शिक्षण), बबन परब, अणाव (समाजसेवा), आनंद देवळी, मळगाव (ग्रंथपाल), अनिल हळदिवे, कणकवली (क्रीडा) यांचा समावेश आहे. तर युवाप्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणा-या तरुणांमध्ये प्रसाद गावडे (पर्यावरण), रवी जाधव (सामाजिक कार्य), प्रमोद दळवी, विलवडे (शेती), मेगल डिसोजा, मालवण (पर्यावरण), पुजा गवस (हाॅटेल व्यवसाय), अक्षय सावंत (चित्रकला) यांचा समावेश आहे. श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी येथे झालेल्या संमेलन संयोजन समितीच्या बैठकीमध्ये प्रा. प्रवीण बांदेकर, अॅड संदिप निंबाळकर, रमेश बोंद्रे यांनी हे जाहीर केले. यावेळी राजेश मोंडकर, अभिमन्यू लोंढे, सुमेधा नाईक, विठ्ठल कदम, मधुकर मातोंडकर, किशोर वालावलकर, मनोहर परब, विजय ठाकर, मंजिरी मुंडले आदि उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles