मागील १० वर्षांच्या प्रामाणिक समाजसेवेचे मिळाले फळ!, युवा बांधवांसह तमाम मतदारांचे ऋण नक्की फेडणार! ; सावंतवाडीचे नवनिर्वाचित युवा नगरसेवक देव्या सूर्याजी यांनी मानले मतदारांचे आभार!

सावंतवाडी : मागील दहा वर्षांपासून माझ्या युवक बांधवांसोबत मी करत असलेल्या प्रामाणिक समाजसेवेमुळे आणि मतदारांच्या अफाट प्रेमामुळे आजचा विजय संपादन करू शकलो. यात माझ्यावर विश्वास टाकणारे आमचे नेते व आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख संजू परब यांसह तमाम सावंतवाडीकर आणि जनतेचे मी आभार मानतो. तसेच आगामी काळात माझ्याकडून असलेल्या जनतेच्या अपेक्षा नक्की पूर्ण करणार, अशी ग्वाही सावंतवाडी नगारपरिषदेचे शिंदे शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक तथा युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी व्यक्त केले.

देव्या सूर्याजी यांनी प्रभाग क्रमांक 6 मधून विजय संपादन केला. या प्रभागात अत्यंत चुरशीची लढत झाली. यात देव्या सूर्याजी यांनी बाजी मारली आहे. दिव्या सूर्याजी यांना 507 मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी भारतीय जनता पार्टीचे अजित नागेश गौंडळकर यांना 345 मते मिळाली इतर उमेदवार गुरुदत्त (शेखर) काशिनाथ गवंडळकर – शिवसेना (उबाठा) – 134, उदय भोसले – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – 30, भिसे अरुण मुरलीधर – काँग्रेस – 19 व
– नोटा – 10 अशी मते मिळाली आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles