ओरोस येथे उद्या रंगणार ‘युरोत्सव २०२६’चे भव्य आयोजन. ; महाराष्ट्राची लोकधारा साकारणारा सांस्कृतिक सोहळा, सुपर – ३० सिंधु शैक्षणिक न्यास, सिंधुदुर्गचे आयोजन.

ओरोस : युरोकिड्स प्री-स्कूल, ओरोस यांच्या वतीने ‘युरोत्सव २०२६’ या वार्षिक सांस्कृतिक महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्राची लोकसंस्कृती, परंपरा व कला यांचे दर्शन घडवणारा हा कार्यक्रम शनिवार, १७ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजल्यापासून ओरोस येथील शरद कृषी भवन येथे संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाची संकल्पना “महाराष्ट्राची लोकधारा – परंपरेचा श्वास, संस्कृतीचा आवाज” अशी असून विद्यार्थ्यांच्या माध्यमातून विविध लोककला, नृत्य, वेशभूषा व सांस्कृतिक सादरीकरणे सादर केली जाणार आहेत.
या सोहळ्यासाठी सुप्रसिद्ध प्रेरणादायी वक्ते रुपेश पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे निमंत्रण सुपर ३० सिंधु शैक्षणिक न्यास, सिंधुदुर्ग  यांच्या संचालिका सौ. नीता अर्जुन सातोस्कर यांनी दिले आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सौ. निधी निलेश गोसावी (मुख्याध्यापिका, युरोकिड्स प्री-स्कूल, ओरोस) तसेच सौ. प्रज्ञा प्रदीप निर्गुण (मुख्याध्यापिका, विद्यानिधी इंग्लिश मिडियम स्कूल, ओरोस) मार्गदर्शन करणार आहेत. या सोहळ्यात मास्टर. विहान विजय पाटील विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून सहभाग घेणार आहे.
‘युरोटसव २०२६’च्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळणार असून पालक, शिक्षक व नागरिकांसाठी हा एक सांस्कृतिक पर्वणी ठरणार आहे. आयोजकांनी नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles