जनतेच्या सेवेसाठी जीव ओतून कार्य करू! : संदीप गावडे. ; तळवडे जिल्हा परिषद गटातून भाजपाच्या युवा नेते संदीप गावडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल.

सावंतवाडी : तळवडे जिल्हा परिषद मतदार संघातून भारतीय जनता पार्टीचे युवा नेते संदीप गावडे यांनी निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या सोबत भारतीय जनता पार्टीचे राज्य युवा नेते विशाल परब, विनोद राऊळ, भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्यासह पक्षाचे शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच मतदारसंघातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यावेळी बोलताना संदीप गावडे यांनी सांगितले की, तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघाचा सर्वांगीण कायापालट करण्यासाठी आपण जीव ओतून काम करू. भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी आपल्यावर विश्वास दाखवत निवडणुकीसाठी संधी दिली आहे. त्या विश्वासाला आपण निश्चितच सार्थकी लावू, असे आश्वासन देत त्यांनी सर्व नेत्यांचे आभारही मानले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles