वेंगुर्ला : उभादांडा येथे शिवसेना (ठाकरे) उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारं
वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा जिल्हा परिषद मतदारसंघाचे ठाकरे शिवसेनेचे उमेदवार संजय दत्ताराम गावडे तसेच पंचायत समिती मतदारसंघाचे उमेदवार गंधाली तांडेल यांच्या प्रचाराचा शुभारंभ उभादांडा–मुठ येथील श्री केपादेवी मंदिरात नारळ फोडून करण्यात आला.
या प्रसंगी दोन्ही उमेदवारांसह माजी सरपंच अनसूय गावकर, चंद्रकांत गावडे, केपादेवी गावकर, बाळू गावकर, उदय गावडे, सुधीर डिचोलकर, सुजित चमणकर, सुंदर परब, बाळू साळगावकर, महिला तालुकाप्रमुख साक्षी चमणकर, राजश्री मर्ये, लक्ष्मी पेढेकर, नम्रता कुर्ले, दीपा पेढेकर, दादा पेढेकर, अभिमन्यू भुते, बाळू धुरी, नंदन वालावलकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देवीचे आशीर्वाद घेऊन प्रचाराला सुरुवात करण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, आगामी निवडणुकीत मतदारांचा सकारात्मक प्रतिसाद मिळेल, असा विश्वास यावेळी उमेदवारांकडून व्यक्त करण्यात आला.



