निरवडे येथील संस्कार नॅशनल स्कूलमध्ये उद्या ‘संस्कार उत्सव’. ; स्नेहसंमेलन, बक्षीस वितरण कार्यक्रमास लाभणार दिग्गजांची उपस्थिती.

✍️ भूषण आरोसकर.

सावंतवाडी : दर्शन विद्या एज्युकेशन सोसायटी, ठाणेचे संस्कार नॅशनल स्कूल निरवडेचे स्नेहनसंमेलन आणि बक्षीस वितरण सोहळा मंगळवार, दि. 3 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे. सायंकाळी 5 वा. शाळा प्रांगणात उद्घाटन सोहळा होणार आहे. उद्घाटन कार्यक्रमास मध्यप्रदेशचे माजी कॅबिनेट मंत्री धर्माचार्य आणि विश्व ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष योगेंद्र महंतजी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

यावेळी प्रांत अधिकारी समीर घारे, उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे, तहसीलदार श्रीधर पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. स्नेहसंमेलन आणि बक्षीस वितरण कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थाध्यक्ष डॉ. शेखर जैन,  शाळा व्यवस्थापन समिती, पालक-शिक्षक समिती आणि मुख्याध्यापक प्रणाली रेडकर यांनी केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles