सावंतवाडी : तालुक्यातील मळगाव येथे उदय जामदार अचानक मित्र मंडळ व अचानक महिला मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्यांदाच कराओके गायन स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला गावातील रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या गायन स्पर्धेत अभिषेक परब, प्रितेश दाभोलकर, काव्या गावडे, अजित सावंत, अनिल यादव, तन्वी गोसावी, प्रशांत मांजरेकर, गौतम सावंत, मुग्धा गोसावी, पांडुरंग बुगडे, ओमकार मेस्त्री, गायत्री वाळवे, सुभाष सावळ, सुनील गोवेकर, नेहा भांगले, संदीप खानोलकर, मंदार बर्डे यांनी आपली गायनकला सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे –
१) प्रथम क्रमांक – कु. तन्वी गोसावी( रोख रक्कम ₹3333 – हनुमंत पेडणेकर पुरस्कृत)
२( द्वितीय क्रमांक – कु. स्वराज धुरी – (रोख रक्कम ₹2222 – बाळू गावडे पुरस्कृत)
३) तृतीय क्रमांक – प्रितेश दाभोलकर
(रोख रक्कम ₹1111 – अमर वेंगुर्लेकर पुरस्कृत)
तसेच
उत्तेजनार्थ पारितोषिके सुनील गोवेकर, मुग्धा गोसावी व अजित सायांना प्रदान करण्यात आली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मारुती पाटील यांनी अत्यंत प्रभावीपणे केले, तर परीक्षक म्हणून अमित लाखे यांनी जबाबदारी पार पाडली.
पहिल्याच वर्षी मिळालेल्या या भरघोस प्रतिसादामुळे मळगावात सांस्कृतिक उपक्रमांना नवी दिशा मिळाल्याची चर्चा होत आहे.



