तरुणाईच्या साथीने संदीप गावडेंचा घवघवीत विजय निश्चित! ;  भाजपा युवा नेते विशाल परब यांचा ठाम दावा

सावंतवाडी : तळवडे मतदारसंघात आज सकाळपासूनच मतदान केंद्रांवर तरुणांचा प्रचंड उत्साह पाहायला मिळत असून, या उत्स्फूर्त सहभागामुळे उमेदवार संदीप गावडे यांचा मोठा आणि निर्णायक विजय निश्चित असल्याचा ठाम दावा भाजपा युवा नेते विशाल परब यांनी केला आहे.
तळवडे मतदारसंघातील दौऱ्यादरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना विशाल परब म्हणाले की, वरिष्ठ नेत्यांचे अचूक नियोजन, विकासाचा स्पष्ट व्हिजन आणि तरुणांची ताकद यामुळे महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होतील, यात कोणतीही शंका नाही.


यावेळी महायुतीचे उमेदवार संदीप गावडे, माजी पंचायत समिती सभापती पंकज पेडणेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण मतदारसंघात उत्साहाचं वातावरण असून, विजयाचा आत्मविश्वास कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles