आधी लगीन लोकशाहीचं!, मतदानाचा अधिकार बजावणारी नववधू मतदान करून थेट लग्नमंडपात! ; माधवी दाभोलकर यांचे कौतुक, सिंधुदुर्गमध्ये लोकशाहीप्रती जागरूकतेचे सुंदर उदाहरण.

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात आज जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे. या पार्श्वभूमीवर वेंगुर्ला तालुक्यातील परुळे येथील मतदान केंद्र क्रमांक 34/13 वर नववधू माधवी दाभोलकर यांनी आपल्या लग्नाच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावला. मतदान करून त्या थेट लग्नमंडपाकडे रवाना झाल्या. नागरिकत्वाची जाणीव ठेवत त्यांनी मतदानाला प्राधान्य दिल्याने उपस्थितांचे लक्ष वेधले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles