सावंतवाडी : आज माजगाव जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पाडली असून आमचं माजगाव गाव नक्कीच इतिहास घडवणार आहे. ह्याचं कारण म्हणजे मराठा समाजाचे अस्तित्व नकारात्मक भावनेने बघून आयात उमेदवार दिला गेला. त्यामुळे भावी पंचायत समिती सदस्य, आमचे मित्र जितू गावकर यांच्या पाठीशी माजगावमधील सर्व मराठा समाज एकजुटीने उभा राहिला असून आपली खरी ताकद दाखवून नक्कीच ९ तारखेला दिसेल.
या लढ्यात सहभागी झालेल्या प्रत्येक मराठा बांधवाला मनापासून लाख लाख शुभेच्छा. “एक मराठा – लाख मराठा” ही केवळ घोषणा नाही, ती आता प्रत्यक्षात उतरलेली ताकद आहे!
इतर कोणत्याही समाजावर आरोप न करता, संविधानानुसार खुला प्रवर्ग असतानाही जाणीवपूर्वक उमेदवारी देण्यात आली.
मात्र तरीही माजगावच्या मराठा समाजाने संयम, शिस्त आणि एकजूट दाखवत समाजाचे काम केले. हेच खरे विजयाचे गमक असेल असे देखील श्री. सावंत म्हणाले.



