मोहिनी मडगांवकर सभापती झाल्या अन् वेदिका परबांनी शुभेच्छा दिल्या!

सावंतवाडी :  सावंतवाडी नगरपालिकेच्या उद्यान व पर्यटन समितीच्या सभापतीपदी सौ. मोहिनी मडगांवकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी सौ. वेदिका परब यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला भाजपा युवानेते विशाल परब यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच नगरसेविका सौ. सुकन्या टोपले, सौ. सुनीता पेडणेकर, सौ. दुलारी रांगणेकर, मेघा डुबळे, दोडामार्ग येथील रंगनाथ गवस, वेंगुर्ला सभापती सचिन शेटये, शिरीष नाईक, केतन आजगांवकर, धिरेंद्र म्हापसेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सौ. मोहिनी मडगांवकर यांच्या पुढील कार्यकाळासाठी सर्वांनी शुभेच्छा व्यक्त करत उज्ज्वल कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles