विधायक अन् रचनात्मक कार्यातून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करा! : आ. रवींद्र चव्हाण. ; भाजपा नवनिर्वाचित शिलेदारांनी विजयानंतर घेतली प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची सदिच्छा भेट!

सावंतवाडी: जनतेने मोठ्या अपेक्षेने आपल्याला निवडून दिले आहे. जनतेच्या अपेक्षेला विकासात्मक, विधायक आणि रचनात्मक कार्यातून पूर्ण करा तसेच सतत जनतेचे प्रश्न सोडवून विकासात्मक कार्यातून स्वतःची ओळख निर्माण करा असा सल्ला भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी दिला आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने मिळवलेल्या दणदणीत विजयानंतर, सावंतवाडीचे भाजप युवा नेते  विशाल परब, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, नवनिर्वाचित जि.प. सदस्य संदीप गावडे, पं.स. सदस्य गौरव मुळीक, युवा नेते संघटक विनोद राऊळ, समीर नेमळेकर आणि यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांची सदिच्छा भेट घेतली.

याप्रसंगी सर्व नवनिर्वाचित सदस्यांना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. मनापासून सर्वांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. जनसेवेच्या मार्गावरील यशस्वी वाटचालीसाठी आपण सर्वांनी एकत्र वाटचाल करू आणि भारतीय जनता पार्टीचा नावलौकिक तळागाळातील जनतेच्या सेवेतून अधिक उज्वल करू, असे यावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles