सिंधुदुर्ग जिल्ह्यात उर्जा मित्र बैठकांचे आयोजन, बुधवार १८ फेब्रुवारी रोजी पहिल्या बैठकीचे आयोजन. ; ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या मागणीला यश.

वैभववाडी :  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विज ग्राहकांच्या समस्या वेळेवर मार्गी लावण्यासाठी तसेच विज ग्राहक आणि विज अधिकारी यांच्यातील संवाद अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या बुधवारी तालुका स्तरावर व उपविभाग स्तरावर उर्जा मित्र बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील विज ग्राहकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी उर्जा मित्र बैठकांचे आयोजन करण्यात यावे अशी लेखी मागणी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या दि. २४ नोव्हेंबर,२०२५ रोजी संपन्न झालेल्या बैठकीत ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष व अशासकीय सदस्य प्रा.एस.एन. पाटील यांनी केली होती. जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या अध्यक्षा तथा जिल्हाधिकारी श्रीम. तृप्ती धोडमिसे आणि सचिव तथा जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. विजय सहारे यांनी या मागणीची दखल घेऊन महावितरण विभागाला सूचना दिल्या होत्या. त्यानुसार कार्यकारी अभियंता, महावितरण कणकवली व कुडाळ यांनी तालुका व उपविभाग स्तरावर उर्जा मित्र बैठक आयोजित करून त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश संबंधित प्रशासनाला दिले आहेत. जिल्ह्यातील आठही तालुका आणि उपविभाग स्तरावर बुधवार दिनांक १८ फेब्रुवारी रोजी पहिल्या उर्जा मित्र बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे. या बैठकीत ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे प्रतिनिधी विज ग्राहक आणि विज प्रशासन यांच्या मधील समन्वयकाची भूमिका बजावणार आहेत. या बैठकीत वीजपुरवठा, बिलिंग, मीटर दुरुस्ती, खांब-तार बदल, तक्रारींची नोंद व निकाली काढणे, तसेच विज ग्राहकांचा महावितरण अधिकाऱ्यांशी थेट संवाद होणार आहे. ग्राहकांच्या अडचणींचे त्वरित निराकरण व्हावे, सेवा अधिक पारदर्शक व्हावी आणि विजविषयक जनजागृती वाढावी, हा या उर्जा बैठकीचा प्रमुख उद्देश आहे. तालुका आणि उपविभाग स्तरावर होणाऱ्या या बैठकींमुळे ग्रामीण भागातील ग्राहकांनाही आपल्या तक्रारी मांडण्याची संधी मिळणार आहे. जिल्ह्यातील विज ग्राहकांनी उर्जा मित्र बैठकीत सहभागी होऊन आपल्या तक्रारी, सूचना व अभिप्राय मांडावेत, ज्यामुळे वीजसेवा अधिक दर्जेदार होण्यास मदत होणार आहे.

तालुकानिहाय उर्जा मित्र बैठकांबाबत माहितीसाठी –  वैभववाडी- श्री.कुमार स्वामी (9405508283), कणकवली- श्रीम.श्रध्दा कदम (9422079634), देवगड- श्री.नारायण माने (9657495281), कुडाळ- श्री.प्रदिप शिंदे (8788327516), मालवण- श्री.श्रीकांत वेंगुर्लेकर (9422055075), वेंगुर्ला-डॅा.आनंद बांदेकर (9421147021) व प्रा.सचिन परूळकर (9421238053), सावंतवाडी- प्रा. रूपेश पाटील (7972775459), दोडामार्ग- श्री.राजेश मणेरीकर (9763325403) यांच्याशी संपर्क साधावा व उर्जा मित्र बैठक यशस्वी करावी, असे आवाहन ग्राहक पंचायत महाराष्ट्र सिंधुदुर्ग जिल्हा शाखेने केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles