सावंतवाडी : सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा आरपीडी महाविद्यालयाचे संचालक प्रा. सतीश बागवे यांचे वडील लक्ष्मण बागवे यांचे कसाल येथे राहत्या घरी नुकतेच निधन झाले. ते 96 वर्षाचे होते. त्यांना सामाजिक कार्याची आवड होती. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान परिवाराने त्यांच्या दुःखात सहभागी होऊन कै. लक्ष्मण बागवे यांना श्रद्धांजली वाहिली.



