सावंतवाडीत खळबळ! – गर्भवती महिलेचा आमरण उपोषणाचा इशारा! ; प्रशासन महिला दिन साजरा करणार, पण न्याय देणार का?

सावंतवाडी : वरिष्ठांच्या स्पष्ट आदेशानंतरही साटेली तर्फ सातार्डा येथे ग्रामपंचायत डाटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून रुजू करून घेत नसल्याचा गंभीर आरोप करत सौ. वैभवी प्रशांत साटेलकर यांनी थेट आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे, त्या जागतिक महिला दिनापासून पंचायत समिती सावंतवाडी समोर उपोषणाला बसणार असल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
“मी गर्भवती आहे. तरीही मला न्याय मिळत नाही. उपोषणादरम्यान मला किंवा माझ्या बाळाला काहीही झाल्यास त्याला सरपंच, उपसरपंच, तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी कुबल आणि विद्यमान ग्रामपंचायत अधिकारी सावंत हेच जबाबदार असतील,” असा थेट इशारा सौ. साटेलकर यांनी दिला आहे.
एकीकडे जिल्हाभरात महिला दिनाचे सोहळे, सत्कार आणि घोषणांचा गजर होणार; तर दुसरीकडे एका गर्भवती महिलेला आपल्या हक्कासाठी उपोषणाचा मार्ग पत्करावा लागत आहे, ही प्रशासनासाठी मोठी शरमेची बाब ठरणार का?
प्रशासन वेळेत हस्तक्षेप करून हा वाद मिटवणार का? की महिला दिनीच उपोषणाचा ठिणगी पेटणार?
तालुक्याचे लक्ष आता प्रशासनाच्या भूमिकेकडे लागले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles