संतापजनक…! – आठ वर्षांच्या मुलीवर स्कूल बस ड्रायव्हरकडून लैंगिक अत्याचार ; ३५ वर्षीय नराधमाला बेड्या.

पुणे : मागील काही दिवसांमध्ये अल्पवयीन मुली, महिला यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. बदलापूर, अकोला, पुणे यासह राज्याच्या अनेक मोठ्या शहरांमध्ये अल्पवयीन मुलीसोबत घडलेल्या घटनांनी नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. अशातच पुण्यात पुन्हा एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.

स्कूल बस ड्रायव्हरने आठ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना पुण्यातील वानवडी भागात घडली आहे. या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून 35 वर्षांच्या स्कुल बस ड्रायव्हरला अटक करण्यात आली आहे. 1 ऑक्टोबरला सकाळी हा स्कुल बस ड्रायवर विद्यार्थ्यांना घेऊन शाळेत पोहचला. मात्र, आठ वर्षांच्या पिडित मुलीला त्याने खोटे कारण सांगून बसमध्येच थांबवून घेतले आणि तीच्यावर अत्याचार केले. पिडीत मुलीने पालकांना ही माहिती दिल्यावर ड्रायव्हरला अटक करण्यात आली. पिडीत मुलीची प्रकृती व्यवस्थित आहे.

बारामतीतील दोन अल्पवयीन मुलींवर हडपसरमध्ये लैंगिक अत्याचार –

बारामतीतील दोन अल्पवयीन मुलींना पुण्यातील हडपसर परिसरातील चार जणांनी अत्याचार केला होता त्यानंतर आणखी सात जणांनी अत्याचार केल्याचा प्रकार तपासामध्ये समोर आला आहे. यामधील ज्ञानेश्वर आटोळे, अनिकेत बेंगारे यश उर्फ सोन्या आटोळे अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत. बारामती तालुका ग्रामीण पोलिसांनी तपास केल्यानंतर यापूर्वी या दोन मुलींवर बारामतीतीलच सात जणांनी अत्याचार केल्याची घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी यामधील आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. या आरोपींचा पोलीस शोध घेत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles