सावंतवाडी पोलिसांचा ‘ऑल आऊट’ धडाका! ; दारू व जुगार अड्ड्यांवर सलग छापे; ५ जणांवर कारवाई, मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त!

सावंतवाडी :  सावंतवाडी पोलीस ठाणे हद्दीत काल राबविण्यात आलेल्या ‘ऑल आऊट ऑपरेशन’मध्ये अवैध दारू विक्री, वाहतूक तसेच मटका जुगारावर जोरदार कारवाई करण्यात आली. विविध ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
👉 सातार्डा रायचे पेड (कारवी वाडी) येथे आरोपी चेतन पिळणकर याच्या ताब्यातून १५०० रुपयांच्या ‘डॉक्टर’ ब्रँडच्या १५ दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.
👉 तळवडे गडगेवाडी येथे आरोपी शंकर विठ्ठल मांजरेकर हा आपल्या घराच्या पाठीमागील विहिरीजवळ ५७०० रुपयांच्या ४८ दारूच्या बाटल्या बिगर परवाना विक्रीच्या उद्देशाने बाळगताना आढळून आला.
👉 आंबोली चेक पोस्ट येथे मोठी कारवाई करताना शुभम अजित कुमार मुधा (वय ४४, रा. हातकणंगले) हा गोवा ते कोल्हापूर प्रवासादरम्यान सुझुकी Access (MH 51 E 6290) या वाहनावरून सुमारे २५,००० रुपयांच्या ८० दारूच्या बाटल्या बिगर परवाना वाहतूक करताना सापडला. या कारवाईत दारूसह सुमारे ७०,००० रुपयांची दुचाकी जप्त करण्यात आली.
👉 कोलगाव नाईक बाग धुरीटेम येथे रामचंद्र वसंत सावंत यांच्या ताब्यातून २३०० रुपयांच्या २३ दारूच्या बाटल्या विक्रीच्या उद्देशाने ठेवलेल्या स्थितीत मिळून आल्या.
👉 तर सालईवाडा, सावंतवाडी येथे आरोपी शेखर बाबाजी नलावडे हा २६०० रुपयांच्या मटका जुगार साहित्यांसह रंगेहाथ सापडला.
⚖️ या सर्व कारवायांमध्ये ४ जणांविरुद्ध दारूबंदी कायद्याखाली तर १ जणाविरुद्ध जुगार कायद्याखाली गुन्हे दाखल करण्यात आले असून संबंधित सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
👮‍♂️ या धडक मोहिमेत API पंकज शिंदे, जमादार टाकेकर, हवालदार अनिल धुरी, जाधव, राऊत, शिंदे, शिंगाडे तसेच प्रकाश कदम यांनी सक्रिय सहभाग घेत विविध ठिकाणी छापे टाकून ही कारवाई यशस्वी केली.
🔥 सावंतवाडी पोलिसांच्या या झणझणीत ‘ऑल आऊट’ कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली असून पुढील काळात अशा मोहिमा अधिक तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles