शिरोडा वेळागर येथे ८ ते ९ फूटाचा डॉल्फिन मृत अवस्थेत आढळला.

वेंगुर्ला: तालुक्यातील शिरोडा येथील वेळागर समुद्रकिनाऱ्यावर आज सकाळच्या सुमारास सुमारे ८ ते ९ फूट लांबीचा डॉल्फिन मासा मृत अवस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. हा मृत डॉल्फिन Sea Horse Hotel समोरील समुद्रकिनाऱ्यावर येऊन अडकलेला दिसून आला.
स्थानिक नागरिकांनी सकाळी समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारताना हा प्रकार प्रथम निदर्शनास आणला. काही वेळातच ही बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि डॉल्फिन पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. समुद्री जैवविविधतेचा महत्त्वाचा घटक मानल्या जाणाऱ्या डॉल्फिनच्या मृत्यूमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, नैसर्गिक कारणे, समुद्रातील प्रदूषण किंवा मासेमारी जाळ्यात अडकणे ही शक्यता व्यक्त केली जात आहे.
सदर घटनेची माहिती संबंधित प्रशासन व मत्स्यव्यवसाय विभागाला देण्यात आली असून, पंचनामा व पुढील तपासानंतर मृत्यूचे खरे कारण समोर येण्याची शक्यता आहे. पर्यावरणप्रेमी व स्थानिक नागरिकांनी समुद्री जीवसृष्टीच्या संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी समुद्रातील प्लास्टिक कचरा व बेकायदेशीर मासेमारीवर नियंत्रण ठेवणे अत्यावश्यक असल्याचेही मत व्यक्त होत आहे

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles