कुडाळ एमआयडीसीत अंमली पदार्थांवर पोलिसांचा धडक छापा. ; संशयित युवक ताब्यात.

कुडाळ : येथील एमआयडीसी परिसरात अंमली पदार्थांची विक्री आणि साठा सुरू असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली असून, पोलिसांनी तातडीने कारवाई करत मोठा साठा जप्त केला आहे. या धडक छाप्यात गांजासदृश अंमली पदार्थांचे १० हून अधिक पाऊच हस्तगत करण्यात आले असून एका संशयित युवकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी परिसरात काही तरुणांकडून अंमली पदार्थांची तस्करी सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी नियोजनपूर्वक सापळा रचत अचानक छापा टाकला. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
छाप्यामध्ये ताब्यात घेतलेल्या युवकाची पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू असून, त्याच्याकडून जप्त केलेल्या साठ्याचा उगम शोधण्याचे काम सुरू आहे. संबंधित युवक हे अंमली पदार्थ कुठून आणत होता, तसेच त्याच्या मागे कोणते जाळे कार्यरत आहे, याचा तपास आता वेगाने केला जात आहे.
दरम्यान, कुडाळ पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अंमली पदार्थ विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अशा अवैध व्यवसायांविरुद्ध पुढील काळात अधिक कठोर मोहीम राबविण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles